Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे
Vivek Kolhe Nashik : मविआ आणि महायुतीच्या नाराजीचा फायदा होणार - विवेक कोल्हे नाशिक शिक्षक मतदारसंघाचा आज निकाल जाहीर होणार आहे. मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात झाली असून निकाल कोणाच्या बाजूने येणार याची सर्वच उमेदवारांना उत्कंठा लागून राहिली आहे. महायुतीने (Mahayuti) दोन उमेदवार दिल्यामुळे महायुतीत सुसूत्रता नव्हती आणि महाविकास आघाडीने (Mahavikas Aghadi) दिलेल्या उमेदवारामुळे महाविकास आघाडीत नाराजी पसरली. त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीतील कुरघोडीच्या राजकारणाचा मला फायदा होईल. निवडणुकीत केलेले आरोप, बोगस मतदान, मला इतर पक्षातील नेत्यांकडून मिळालेला छुपा पाठिंबा यावर 100 टक्के पहिल्या पसंतीत माझा विजय होईल, असा दावा अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी आज मतमोजणी होत आहे. सकाळी आठ वाजेपासून मतमोजणीला (Vote Counting) सुरुवात झाली आहे. 30 टेबलवर मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे 180 कर्मचारी मतमोजणी करत आहे. या निवडणुकीत महाविकास आघाडीकडून शिवसेना ठाकरे गटाचे संदीप गुळवे (Sandeep Gulve), महायुतीतून शिवसेना शिंदे गटाचे किशोर दराडे (Kishor Darade) तर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे महेंद्र भावसार (Mahendra Bhavsar) आणि अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्यात प्रामुख्याने चौरंगी लढत होत आहे.