vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं
vasant gite Office Nashik : वसंत गीतेंचं कार्यालय महापालिकेनं हटवलं नाशिकच्या मुंबई नाका परिसरातील ठाकरे गटाचे नेते माजी आमदार वसंत गीते यांचे जनसंपर्क कार्यालय काल महापालिकेने जमीन दोस्त केले आहे. पालिकेने केलेल्या कारवाईनंतर आज देखील मुंबई नाका परिसरात ठाकरे गटाचे पदाधिकारी कार्यकर्ते यांची गर्दी असल्याने तणाव कायम असल्याचे पाहायला मिळत आहे. नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघाच्या भाजपचे आमदार देवयानी फरांदे यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांवर दबाव टाकून ही कारवाई केली असून महापालिकेच्या आयुक्तांनी देखील त्या संदर्भात बोलतांनी स्पष्ट संकेत दिल्याचा दावा माजी आमदार वसंत गीते यांनी केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक मध्ये राजकीय कुरघोड्यांना सुरुवात झाल्याच या निमित्ताने पाहायला मिळत आहे. यासंदर्भात माजी आमदार वसंत गीते यांच्याशी बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी...