Uddhav Thackeray Malegaon Sabha : ठाकरेंची मालेगावात सभा, कोणावर बरसणार याकडे सर्वांचे लक्ष
आज सर्वांचं लक्ष लागलंय ते उद्धव ठाकरेंच्या मालेगावमधील सभेकडे... रत्नागिरीतील खेडमधील सभेनंतर आज उद्धव ठाकरेंची मालेगावमध्ये सभा होतेय... आणि या सभेत ठाकरी तोफ कधी धडाडणार, याकडे सर्वांचे डोळे लागलेत... विशेष म्हणजे पहिली सभा शिवसेनेचे रामदास कदम यांच्या होमग्राऊंडवर होती... तर आताची सभा दादा भुसेंच्या घरच्या मैैदानात आहे... या सभेमुळे दोन दिवसांपासून राजकीय वातावरण तापलंय... मालेगावमधील म.स.गा. म्हणजेच MSG महाविद्यालयाच्या प्रांगणात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरेंची सभा होणाराय... सभेसाठी भव्य व्यासपीठ उभारले असून एक लाखांपेक्षा जास्त कार्यकर्ते बसतील अशी व्यवस्था करण्यात आलीये...
Tags :
Malegaon Nashik Sabha Sanjay Raut Thackeray Group SHIVSENA : Uddhav Thackeray Dada Bhuse Homeground