Trimbakeshwar मंदिरात इतर धर्मियांनी बळजबरीनं शिरण्याचा केला प्रयत्न,मंदिर प्रशासनाचा आरोप
त्र्यंबकेश्वरच्य़ा मंदिरात दोन दिवसांपूर्वी इतर धर्मियांनी बळजबरीनं शिरण्याचा प्रयत्न केला, असा आरोप मंदिर प्रशासनानं केला आहे.. १३ मे रोजी ही घटना घडल्याचा दावा केला जातोेय. सुरक्षा रक्षकांनी जमावाला रोखून धरलं, पोलीस आणि मंदिर प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर तणाव निवळला असं मंदिर प्रशासनाचं म्हणणं आहे. दरम्यान, या अन्य धर्मियांवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलन करू, असा इशारा ब्राह्मण महासंघानं दिला आहे.