Nashik Rain : नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात भीषण स्थिती, पाऊस नसल्यानं नदी - नाले कोरडे
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यात अजूनही दमदार पाऊस न झाल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत. ३२ गावं आणि १५ वाडी-वस्त्यांवर ऐन पावसाळ्यात टँकरनं पाणीपुरवठा सुरू आहे. येवला तालुक्यात ४७ ठिकाणी रोज ५० खेपांद्वारे २० टँकर पाणीपुरवठान करत आहेत. तालुक्यातील बंधारे, नदीला पाणी आले नसल्याने विहिरींनी देखील तळ गाठला आहे. दरम्यान,पालखेड डावा कालव्याचे आवर्तनातून साठवण तलाव भरल्याने तालुक्यातील ६२ गावं आणि वाडी-वस्त्या टँकरमुक्त झाल्या आहेत.
Continues below advertisement