नाशिकमध्ये जमावबंदीचे आदेश असतानाही शिक्षकांचं प्रशिक्षण; कार्यालयात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

शहरात जमावबंदीचे आदेश लागू असतानाच मनपा प्रशासनाने प्रशिक्षणासाठी  एकाच बेळी बोलवले शेकडो शिक्षक. कोरोना बधितांची संख्या वाढत आहे, रुग्णना बेड मिळत नसल्याने प्रशासनाने सेन्ट्रल बेड रिझर्वेशन सिस्टिम तयार केलीय. यावर देखरेखीसाठी प्रत्येक रुग्णलयात एका शिक्षकाची नेमणूक केली जाणार आहे, त्यांचे प्रशिक्षण आज आयोजित केले होते पण या प्रशिक्षणाला शेकडो शिक्षक उपस्थित होते, सोशल डिस्टन्सिंग चा फज्जा उडाला होता, विशेष म्हणजे ज्या महिला शिक्षिका गरोदर आहेत, 50 वर्षावरच्या आहेत जे सेवा निवृत्त किंवा मयत आहेत आहेत त्याच्या नावाने ही प्रशिक्षणसाठी हजर राहण्याची नोटीस पाठविण्यात आलीय, एकूणच भोंगळ कारभारावर शिक्षकांनी आक्षेप घेतल्याने उद्या पुन्हा बैठक बोलविण्यात आलीय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola