स्वातंत्र्याबद्दलच्या 'त्या' वक्तव्यावर कुणी साहित्यिक बोलला नाही याचं वाईट वाटतं : Balasaheb Thorat

Continues below advertisement

Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : नाशिकमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन पार पडलं. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये सारस्वतांचा मेळा तीन दिवस चालला. या साहित्य संमेलनाच्या समारोपावेळी 95 व्या साहित्य संमेलनाचं ठिकाणही ठरलं आहे. आगामी मराठी साहित्य संमेलनाचा मान मराठवाड्याला मिळाला आहे. 95 वे मराठी साहित्य संमेलन लातूर जिल्ह्यातील उदगीरमध्ये पार पडणार आहे. चार महिन्याच्या आत पुढील साहित्य संमेलन होणार असल्याचीही माहिती नाशिक साहित्य संमेलनात देण्यात आली. तर पाच वर्षानंतर पुन्हा एकदा नाशिकमध्ये साहित्य संमेलन होणार आहे, ही असे अखिल भारती मराठी साहित्य महामंडळाचे विद्यमान अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांनी नाशिकध्ये सांगितलं.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram