T 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppT 20 World Cup Celebration Nashik : नाशिकमध्ये T 20 विश्वचषक विजयाचं सेलिब्रेशन ारताने साऊथ आफ्रिके विरुद्ध टी- ट्वेंटी वर्ल्डकपवर मोठा विजय मिळवला आहे. देशभर सर्व भारतीयांनी आनंदोत्सव साजरा केला नाशिकमध्ये देखील गोल्फ क्लब मैदान या ठिकाणी दररोज क्रिकेटचा सराव करणारे खेळाडू आणि क्रीडा शिक्षक यांनी आज आनंदोत्सव साजरा केला काल झालेल्या सामन्यातील विराट कोहलीची बॅटिंग आणि सूर्यकुमार यादवचा धडकी भरवणारा कॅच बघता सर्व भारतीयांची टी ट्वेंटी वर्ल्ड कप जिंकण्याची इच्छा पूर्ण केल्याची भावना नाशिकच्या क्रिकेट प्रेमींनी व्यक्त केली. त्यांच्याशी संवाद साधला प्रतिनिधी शुभम बोडके यांनी... रोहित शर्मानं भारतानं टी 20 वर्ल्ड कप फायनलमध्ये विजय मिळवल्यानंतर जंगी सेलिब्रेशन केलं. रोहित शर्मानं उपकॅप्टन हार्दिक पांड्याला त्याच्या कामगिरीबद्दल कौतुक म्हणून किस केलं. हार्दिकनं क्लासेन आणि मिलरची विकेट घेतली. रोहित शर्मानं पत्नी रितिका सचदेव हिला विजयानंर मिठी मारत विजय साजरा केला. रोहित शर्माच्या नेतृत्त्वात भारतानं जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वनडे वर्ल्ड कपच्या अंतिम फेरीत धडक दिली होती. मात्र, भारताला विजेतेपद मिळालं नव्हतं. अखेर रोहितच्या टीम इंडियानं अपयश पुसून टाकलं आहे. भारतानं 7 धावांनी मॅच जिंकली. विराट कोहलीवर रोहित शर्मानं विश्वास टाकला होता. अखेरच्या मॅचमध्ये रोहित , रिषभ अन् सूर्यकुमार लवकर बाद झाल्यानंतर विराट कोहलीनं केलेल्या 76 धावा गेमचेंजर ठरल्या. रोहितनं विराटला मिठी मारली.रोहित शर्मानं बारबाडोसच्या स्टेडियमवर नतमस्तक होत तिथूनच भारतमातेला वंदन केलं.