Suhas Kande Winter Session 2023 : 'नाशिकमधील नांदगाव तालुक्यात दुष्काळ जाहीर करावा'
नाशिकच्या नांदगाव तालुक्यातील शेतकरी दुष्काळी परिस्थितीचा सामना करत असतांनाच अवकाळी पाऊस व गारपिटीने चांगलाच झोडपला गेला..अशा परिस्थितीतही तालुका दुष्काळी जाहीर न होता दुष्काळ सदृश जाहीर झाला..यामुळे आ.सुहास कांदे यांनी हिवाळी अधिवेशनात सरकारचे लक्ष वेधून नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी ' लक्षवेधी ' द्वारे सभा गृहात केली..गारपीट व अवकाळी पावसाने होरपळलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी तातडीने सरकारने मदत करावी, चारा छावण्या सुरू कराव्या, तसेच नांदगाव तालुका दुष्काळी जाहीर करावा अशी मागणी या लक्षवेधी द्वारे सरकारकडे मांडली