Lok Sabha Election 2024 Results
(Source: ABP Cvoter)
Suhas Kande : Chhagan Bhujbal यांना मिर्ची लागायची गरज नाही, सुहास कांदे का संतापले?
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppSuhas Kande on Chhagan Bhujbal, Dindori Loksabha : मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याकडून दिंडोरी लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा प्रचार सुरु आहे, असा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे (Suhas Kande ) यांनी केला होता. दरम्यान, आता सुहास कांदे यांनी छगन भुजबळांकडून तुतारीचा प्रचार सुरु असल्याचे पुरावे सादर केले आहेत. भुजबळ व कार्यकर्त्यांकडून तुतारीचा प्रचार सुरू असल्याचे विविध फोटो व पुरावे देत सुहास कांदे यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्यावर हल्लाबोल केला आहे.
भुजबळांचे निकटवर्तीय हे तुतारीचे प्रचार करत असल्याचे पुरावे
भुजबळांचे खायचे दात वेगळे अन् दाखवायचे दात वेगळे आहेत, असा आरोप कांदे यांनी केला आहे. पुढे बोलताना कांदे म्हणाले, नांदगाव व येवला विधानसभा मतदार संघातील भुजबळांचे (Chhagan Bhujbal) निकटवर्तीय हे तुतारीचे प्रचार करत असल्याचे पुरावे माझ्याकडे आहेत. भुजबळांनी (Chhagan Bhujbal) मराठा आरक्षणावेळी मोठे ओबीसींचे मेळावे घेतले. आता महायुतीच्या उमेदवार असलेल्यांसाठी मेळावे घ्यावे व महायुतीच्या उमेदवारांचा प्रचार करावा , असा उपरोधिक टोलाही त्यांनी लगावला.