Sudhakar Badgujar यांना सलीम कुत्तासोबतच्या डान्स प्रकरणात तडीपारीची नोटीस

Sudhakar Badgujar यांना सलीम कुत्तासोबतच्या डान्स प्रकरणात तडीपारीची नोटीस

Nashik News : नाशिक : नाशिकचे (Nashik News) ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्या नावानं पोलिसांनी तडीपारीची नोटीस काढली आहे. मात्र, सुधाकर बडगुजर यांनी नोटीस घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे.  बडगुजर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची भेट घेत कायदेशीर सल्ला घेणार असल्याचं बोललं जात आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची नाशकातून पाठ फिरताच ठाकरेंच्या पदाधिकाऱ्याविरोधात नोटीस आल्यानं ठाकरे गट आक्रमक झाला आहे. दरम्यान, सलीम कुत्ता डान्स प्रकरणी सुधाकर बडगुजर हे नाव राज्यभर चर्चेत आलं होतं. ऐन निवडणुकीच्या काळात सुधाकर बडगुजरांविरोधात नोटीस काढल्यानं नाशिकचं राजकारण चांगलंच तापण्याची चिन्ह आहेत. 

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola