Corona Vaccine | आधी कोरोना होणार नसल्याची हमी द्या, मगच लस घेऊ; मालेगावातील मुस्लिम बांधवांची मागणी

Continues below advertisement

मालेगाव : कोरोना लसीकरणाची धूम सुरू असतानाच लसीसंदर्भात येथील मुस्लिम समाजात अजूनही मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. ‘लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही याची लेखी हमी द्या, तरच लस घेऊ’ अशी अजब मागणी मालेगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यांकडे केली जात आहे.

जिल्ह्यासह देशभरात कोरोना लसीकरणाची धूम सुरू असतानाच लसीसंदर्भात मालेगाव येथील मुस्लिम समाजात अजूनही मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. ‘लस घेतल्यानंतर कोरोना होणार नाही याची लेखी हमी द्या, तरच लस घेऊ’ अशी अजब मागणी आरोग्य कर्मचाऱ्यांकडे केली जात आहे.

मालेगाव शहरात 17 दिवसांत दोन हजार 451 ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण झाले. यात मुस्लिम समाजातील ज्येष्ठांची संख्या दोन आकडी देखील नाही. आरोग्य विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना या अजब मागणीसह मुस्लिम बांधव लसीकरणास नकार देत असल्याचे कळविले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने मालेगावला कवेत घेण्यास सुरवात केली आहे. कोरोनाच्या सुरुवातीला गेल्या वर्षी एप्रिल ते जून या काळात शहरातील मुस्लिमबहुल पश्‍चिम भागातील रुग्णसंख्या मोठ्या संख्येने आढळली. यानंतर कोरोनाने आपला मोर्चा कॅम्प- संगमेश्‍वरच्या पश्‍चिम भागाकडे वळविला. जून 2020 ते आजतागायत या भागात रोज शेकडो रुग्ण आढळत आहेत. मध्यंतरीच्या सहा महिन्यांत पूर्व भागातून कोरोना हद्दपार झाला होता. मात्र, अलीकडे या भागातून कमी प्रमाणात का होईना रुग्ण आढळत आहेत.

1 मार्चपासून जिल्ह्यात ज्येष्ठांच्या लसीकरणाला सुरुवात झाली. 70 टक्के लोकसंख्या असलेल्या पूर्व भागातून लसीकरण मोहिमेला ज्येष्ठांनी सुरुवातीच्या 17 दिवसांत तरी धुडकावून लावले आहे. कोरोना व लसीसंदर्भात येथे अजूनही मोठ्या प्रमाणावर गैरसमज आहेत. ‘लसीचा काहीही फायदा होत नाही. लस घेतल्यावर कोरोना होणार नाही, असे लिहून दिले, तर आम्ही घेऊ,’ असे खडे बोल येथील नागरिकांकडून आरोग्य कर्मचाऱ्यांना सुनावले जात आहेत. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram