Sharad Pawar Sabha Hoarding Collapse : शरद पवारांच्या भाषणावेळीच कोसळले स्टेजवरचे होर्डिंग

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांच्या प्रमुख उपस्थितीत आज नाशिक लोकसभा मतदारसंघातील सटाणा येथे जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. राज्यात गेल्या काही दिवसांपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार व अवकाळी पाऊस (Rain) पडत आहे. त्यामुळे, राजकीय नेत्यांनाही या अवकाळी व बदलत्या हवामानाचा फटका बसल्याचं दिसून आलं. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंसह काही नेत्यांच्या सभाही अवकाळीमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तर, मुंबईतील घाटकोपर येथे महाकाय बॅनर कोसळून मोठी दुर्घटना झाली. आता, पुन्हा एकदा बॅनर कोसळल्याची घटना घडली आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवार डॉ. शोभाताई बच्छाव यांच्या प्रचारार्थ शरद पवार यांची सटाणा (Nashik) सभा सुरू असताना सोसाट्याचा वारा सुरू झाला. मात्र, तरीही पवारांनी आपलं भाषण सुरूच ठेवलं होतं. मात्र, यावेळी, व्यासपीठावरील बॅनर कोसळल्याची घटना घडली.

 

 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola