Sharad Pawar : अरे, त्या Sudhir Tambe यांना घ्या पुढे;शरद पवारांच्या त्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
ज्या सुधीर तांबेंनी नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान ऐनवेळी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने महाविकास आघाडीच्या जवळपास सर्वच नेत्यांकडून त्यांच्यावर निशाणा साधला होता. त्याच सुधीर तांबेंची सत्यजीत तांबे निवडून आल्यानंतर राष्ट्रवादीच्या नेत्यांसोबतची जवळीक खूप काही सांगून जातंय.. कारण नाशिकमधील एका कार्यक्रमादरम्यान फोटोसेशन प्रसंगी शरद पवारांनी 'अरे त्या तांबेंना पुढे घ्या असं म्हटलं होतं. त्यावेळी सुधीर तांबेंनी पवारांकडे बघून हात जोडले, त्यामुळे नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीदरम्यान सत्यजीत तांबेंना राष्ट्रवादीचा छुपा पाठिंबा होता का ? अशी देखिल चर्चा या व्हिडीओमुळे आता रंगलीय.