Saroj Ahire : राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे बाळाला घेऊन अधिवेशनात
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील देवळाली मतदारसंघातील आमदार सरोज अहिरे आपल्या अडीच महिन्याच्या बाळाला घेऊन विधान भवन परिसरात आल्या आहेत... त्यांचा अडीच महिन्याचा बाळ प्रशंसक हा त्यांच्या शिवाय राहत नाही.. म्हणून त्या आपल्या बाळाला घेऊनच आज विधानभवनात पोहोचल्या.. विधानभवनात लहान बाळांसाठी करण्यात आलेल्या विशेष कक्षात प्रशंसकला ठेवून त्या विधानसभेच्या कामकाजात सहभागी होणार आहेत. मतदारसंघाचे प्रश्न महत्त्वाचे असून ते विधानसभेत येऊन उचलणे आवश्यक आहे... तसेच अडीच महिन्याच्या बाळाची आई म्हणून त्याच्याबद्दल ही कर्तव्य बजावणं महत्त्वाचं आहे.. म्हणून दोन्ही कर्तव्य एकाच वेळी बजावत असल्याचे मत सरोज अहिरे यांनी व्यक्त केलं आहे. यावेळी अडीच महिन्याचा प्रशंसक विधानभवनातील राजकीय गोंधळापासून अलिप्त राहून आईच्या कुशीत निवांत झोपला होता.
Continues below advertisement