Nashik : संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज यांच्या पालखीचं पंढरपूर कडे प्रस्थान, काय आहे भाविकांच्या मनात?

संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी थोड्याच वेळात आषाढी वारीसाठी पंढरपूर कडे प्रस्थान करणार आहे. या दिंडी सोहळ्यात महाराष्ट्रभरातून ठिकठिकाणाहून 46 दिंड्या सहभागी होणार आहेत. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेली दोन वर्ष पायी वारीवर शासनाने निर्बंध घातल्याने शिवशाही बसने फक्त मानकऱ्यांसह 25 वारकरी पंढरपूरकडे रवाना होत होते यामुळे वारकर्यांचा हिरमोडही झाला होता. यंदा मात्र पायी दिंडीला परवानगी देण्यात आल्याने वारकऱ्यांचा उत्साह द्विगुणित झाला असून कालपासूनच मोठ्या संख्यने वारकरी त्र्यंबकेश्वरमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली आहे, कधी एकदा विठू रायाचं दर्शन घेता येईल याचीच वाट ते बघतायत. दरम्यान काही महिला वारकर्यांशी संवाद साधलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola