Sanjay Raut on Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही - संजय राऊत
Sanjay Raut on Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही - संजय राऊत
त्र्यंबकेश्वरमध्ये काहीही चुकीचं घडलं नाही असं वक्तव्य ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलंय. त्र्यंबकेश्वर मंदिरात कोणीही घुसण्याचा प्रयत्न केला नाही असंदेखील राऊत म्हणालेत. गेल्या १०० वर्षांपासून त्र्यंबकेश्वर मंदिराच्या मुख्य दरवाजावर धूप दाखवण्याची परंपरा असल्याची माहितीही राऊतांनी यावेळी दिली. तर राऊतांच्या या वक्तव्यावरून भाजप आमदार नितेश राणेंनी राऊतांवर घणाघाती टीका केलीये. कुणाला तिथे धूप दाखवायची असेल तर हट्ट का करावा.. हे मुस्लिम लीगच्या प्रवक्त्याला समजलं नसेल अशी टीका नितेश राणे यांनी केलीये.