Nashik Lal Vadal : शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मागण्यांसाठी पुन्हा नाशिकहून मुंबईत धडकणार लाल वादळ

शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुन्हा एकदा नाशिकहून मुंबईत लाल वादळ धडकणार आहे... मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा आणि इतर समविचारी संघटना एकत्र येऊन लाँगमार्च काढणार आहेत... थोड्याच वेळात नाशिकच्या दिंडोरीमधून हा लाँगमार्च निघणार आहे... शेतमालाला योग्य भाव मिळावा, अवकाळीने झालेल्या नुकसानाची तातडीने भरपाई मिळावी त्याचसोबत, वनजमिनींचा हक्क मिळावा यांसह इतरही मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी आंदोलनाचा हा एल्गार पुकारलाय. नाशिकमध्ये एकत्र जमून, नंतर मजल-दरमजल करत हा लाँगमार्च मुंबईत येऊन धडकणारेय. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola