Rajendra Vikhe Patil : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीतून राजेंद्र विखे पाटील यांची माघार
राजेंद्र विखे पाटील
यांची निवडणुकीतून
माघार
----------
नाशिक शिक्षक
मतदारसंघाच्या
निवडणुकीतून माघार
------------
मंत्री राधाकृष्ण
विखे पाटील यांच्याशी
चर्चा करुन निर्णय
----------
अपक्ष उमेदवार
धनराज विसपुते
यांचीही माघार
विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज मागे घेण्याचा आज शेवटचा दिवस, मुंबई, कोकण पदवीधर आणि नाशिक, मुंबई शिक्षक मतदारसंघासाठी २६ जूनला मतदान होणार. शिक्षक आणि पदवीध मतदारसंघ निवडणुकीत कोण माघार घेणार, आघाडी आणि युती धर्माचं कितपत पालन होणार हे आज स्पष्ट होईल. अर्ज मागे घेण्याचा आज अखेरचा दिवस आहे. महाविकास आघाडी आणि महायुतीत आघाडी धर्म न पाहता उमेदवाकांनी अर्ज दाखल केलेत. मविआ आणि महायुतीतील जवळपास प्रत्येक पक्षाने आपला उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवला आहे. यात युती आणि आघाडी धर्म पाळला गेलेला नाही. त्यामुळे आता आज खरंच कोण अर्ज मागे घेणार की मित्रपक्षच आपापसात लढणार याची उत्सुकता आहे. मुंबई शिक्षक,मुंबई पदवीधर, कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक या चार विधान परिषद मतदारसंघांमध्ये येत्या 26 जूनला निवडणुका होणार आहेत.