Raj Thackeray Nashik : अरेरावी करण्यासाठी राज्य दिलं नाहीय , एसटी आंदोलनावरुन राज ठाकरे भडकले ABP Majha

एसटीचे एक लाख कर्मचारी अंगावर आले तर काय कराल असा सवाल मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केलाय. संभाव्य मेस्मा कारवाईवरुन राज यांनी परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर निशाणा साधलाय. लोकांवर अरेरावी करण्यासाठी राज्य हाती दिलेलं नाही अशा शब्दांत नाव न घेता राज यांनी परब यांच्यावर टीका केलीय. संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर मेस्मा अंतर्गत कारवाईला त्यांनी विरोध दर्शवलाय. याबाबत मुख्यमंत्री किंवा सहकारी पक्षांनी बोलावं असंही राज यांनी म्हटलंय. तसंच या संपाबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र पाठवणार असल्याचे राज यांनी सांगितलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola