Raj Thackeray : Nashik मधून राज ठाकरे पुन्हा भरारी घेणार?यंदाचा वर्धापन दिन एकेकाळच्या बालेकिल्ल्यात

Nashik News नाशिक : मनसेचा 18 व्या वर्धापन दिनाचा (MNS Vardhapan Din) सोहळा यंदा नाशिकमध्ये (Nashik) पार पडणार आहे. यासाठी राज्यभरातून पदाधिकारी आणि कार्यकर्ते नाशिकमध्ये दाखल होणार आहेत. यानिमित्त नाशिक मनसेच्या पदाधिकाऱ्यांकडून शहरात जोरदार बॅनरबाजी केली जात आहे.  

मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) 7 मार्चला नाशिक शहरात येणार असून 9 तारखेला दादासाहेब गायकवाड सभागृहात वर्धापन दिना निमित्ताने त्यांची तोफ धडाडणार आहे. कार्यकर्त्यांना ते मार्गदर्शनपर भाषण करणार आहेत. लोकसभा निवडणुकीचे (Lok Sabha Election 2024) रणशिंग ते नाशिकमधून फुंकणार असून भाषणात ठाकरे नक्की काय बोलणार? महायुती सोबत जाण्याची ते काही घोषणा करणार की स्वबळाचा नारा देणार? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेले आहे.  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola