PM Modi Nashik : पंतप्रधान Narendra Modi यांचा उद्या नाशिकमध्ये रोड शो, प्रशासनाकडून ट्रायल
Continues below advertisement
पंतप्रधान नरेंद्र मोदी उद्या 12 जानेवारी ला नाशिकमधे येत आहे. मोदींच्या हस्ते गोदावरी पुजन होणार आहे, या पार्श्वभूमीवर नाशिकच्या रामकुंडावर परिसर आकर्षक फुलांनी सजवला जात आहे, गोदा काठी असणाऱ्या मंदिरावर फ़ुलांच्या माळ सोडण्यात आल्या आहेत. रंगरंगोटी केली जात आहे, पुरोहित संघाचे पदाधिकारी साधू महंत यांनाच गोदा काठावर उपस्थित राहण्याची परवानगी देण्यात आली. मोदींच्या हस्ते जलपूजन होणार असल्याने गोदावरी नदी पात्रात गंगापूर धरणातून पाणी देखील सोडले जाणार आहे, पाण्याच्या पातळी नुसार व्यासपीठ उभारले जाणार आहे, आढावा घेतलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
Continues below advertisement