PM Modi Nashik : लेझिम, ढोल ताशा,शंख वादन; मोदींच्या स्वागतासाठी सांस्कृतिक कार्यक्रम
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई आणि नाशिक दौऱ्यावर येतायेत. मोदींच्या स्वागतासाठी नाशिक मोदीमय झालंय... सकाळी सव्वादहा वाजता मोदींचं नाशिकमध्ये आगमन होणार आहे. त्यानंतर त्यांचा रोड शो होईल, त्यानंतर ते काळाराम मंदिरात दर्शन घेतील. त्यानंतर ते राष्ट्रीय युवा महोत्सव कार्यक्रमाला संबोधित करणार आहेत. हा कार्यक्रम आटोपल्यावर ते मुंबईला रवाना होतील. मोदी मुंबईत जवळपास ३० हजार कोटींच्या विकासकामांचं लोकार्पण आणि भूमिपूजन करणार आहेत. यामध्ये मुंबई ट्रान्स-हार्बर लिंक, बेलापूर-पेंधर नवी मुंबई मेट्रो-१चं औपचारिक उद्घाटन, सीवूड्स-बेलापूर-उरण उपनगरीय रेल्वे सेवेच्या चौथ्या मार्गिकेचा समावेश आहे.