Onion Export Duty : कांद्यावरील 40 टक्के निर्यात शुल्क रद्द करावे,राज्य कांदा उत्पादक संघटनेची मागणी
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील कांदा लिलाव बंदचा आज सलग सहावा दिवस आहे. व्यापाऱ्यांनी अजुनही बंद मागे घेतलेला नाहीये. त्यातच आता शेतकरी संघटनांनी यात उडी घेतली आहे. कांद्यावरील निर्यातमूल्य हटवण्यासाठी राज्य कांदा उत्पादक संघटनेच्या वतीने आज लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं. कांद्यावरील ४० टक्के निर्यात शुल्क रद्द करावे, नाफेड आणि एनसीसीएफ मार्फत खरेदी केलेला कांदा राज्यातील बाजार समित्यांमध्ये विक्री करू नये, कांदा अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर सरसकट जमा करावे या तीन मागण्या आजच्या बैठकीत करण्यात आल्या आहेत. मागण्या मान्य न झाल्यास दिल्लीत ठिय्या आंदोलन करण्याचा इशारा राज्य कांदा उत्पादक संघटनेनं दिला आहे. संघटनेचे अध्यक्ष भारत दिघोळे यांनी काय प्रतिक्रिया दिलीये पाहूयात.
Continues below advertisement