Nivruttinath Palkhi: निवृत्तीनाथांच्या पालखीचं पंढरीकडे प्रस्थान

आता सर्वांना वेध लागलेत ते आषाढी एकादशीचे आणि विठूरायाच्या दर्शनाचे. पालखी सोहळ्यांना सुरुवात झाली आहे आणि आज हरिनामाचा जयघोष करत त्र्यंबकेश्वरहून संतश्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीनं पंढरपूरकडे प्रस्थान केलंय. हजारो वारकरी या निवृत्तीनाथांच्या पालखीसोबत निघाले आहेत. यंदा जवळपास 45 पालख्या विविध ठिकाणांहून दिंडीत सहभागी झाल्या आहेत. वारकऱ्यांसाठी 12 फिरते शौचालय आणि पिण्याच्या पाण्याचे पाच टँकर प्रशासनाकडून पहिल्यांदाच उपलब्ध करून देण्यात आलेत. वारकऱ्यांच्या सोयीसाठी यंदा इतिहासात पहिल्यांदाच एक दिवस आधी पालखी रवाना झालीय. दरवर्षी चतुर्दशीच्या दिवशी होणारे प्रस्थान यंदा त्रयोदशीला करण्यात आलंय.  निवृत्तीनाथांच्या पालखीचा महिला मुक्काम त्यांचे  गुरू गहिनीनाथ महाराजांच्या समाधीस्थळी असणार आहे.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola