Navri Milena Navryala Beed : शेतकरी परिषद : शेतकरी नवरा का नको गं बाई? बीडच्या पोरी काय म्हणतात ऐका
Continues below advertisement
Navri Milena Navryala Beed : शेतकरी परिषद : शेतकरी नवरा का नको गं बाई? बीडच्या पोरी काय म्हणतात ऐका
सध्या शेतकरी नवरा नको ग बाई हेच सर्वत्र ऐकायला मिळते . शेतकरीही आपली मुलगी शेतकरी मुलाला देण्यास तयार नाही. मुलगा शिपाई असला तरी चालेल मात्र शेतकरी नकोच हे तरुण मुलींनीही ठरवून टाकले आहे. या मानसिकतेमुळे प्रत्येक गावात किमान 40 ते 50 मुले बिन लग्नाची आहेत . चाळिशी पार केलेली मुले लग्न कधी होणार या विवंचनेने ग्रासलेली आहेत. त्याचे कुठे कामात लक्ष नसते, त्याच्यात चिडचिड पणा वाढलेला आहे. काहीजण मनोरुग्ण झालेले आहेत . याला कारण आहे शेती मधील बिनभरवशाचे उत्पन्न , शेतीमालाला हमी भाव नाही, कमी व्याज दराने कर्ज पुरवठा नाही, हमखास बाजार पेठ नाही, शासकीय धोरणे शेतकरी हिताची नाहीत.
Continues below advertisement