Nashik Zika Virus : नाशिकमध्ये झिका व्हायरसचा धोका वाढला,26 वर्षीय तरूणाला लागण आरोग्य यंत्रणा सतर्क
Nashik Zika Virus : नाशिकमध्ये झिका व्हायरसचा धोका वाढला, 26 वर्षीय तरूणाला लागण आरोग्य यंत्रणा सतर्क
देशात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंंटची भीती व्यक्त होत असतानाच नाशिकमध्ये झिका व्हायरसचा धोका वाढलाय. शहराच्या पूर्व भागात २६ वर्षीय तरुणाला झिकाची लागण झाल्याने आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झालीय. जिथे रुग्ण आढळून आला तिथे साधारण तीन किलोमीटर अंतरावर महापालिकेच्या वतीने विशेष मोहीम राबवण्यात येत आहे. घरांचं सर्वेक्षण केलं जात आहे. यासंदर्भात नाशिक महापालिकेचे वैद्यकीय अधिकारी तानाजी चव्हाण यांच्याशी संवाद साधलाय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी...