Nashik : राजा रवी वर्मा यांच्या चित्राचं पैठणीवर विणकाम, चेतन धसे कारागिराचं विणकाम ABP Majha
Continues below advertisement
नाशिक जिल्ह्यातील येवल्यात एका कारागिरानं पैठणीवर प्रसिद्ध चित्रकार रवी वर्मा यांनी साकारलेल्या चित्राचं विणकामं केलं आहे.. चेतन धसे असं या तरुण कागागिराचं नाव आहे... येवला शहरातील पैठणी जगभरात प्रसिद्ध आहे. यापूर्वी पैठणीवर जंगल तसंच जंगलात वावरणाऱ्या प्राण्याचं विणकाम करण्यात आलंय... तर कधी शेल्यावर साईबाबा,नरेंद्र मोदी अशा विविध प्रकारचे विणकाम करण्यात आल्याचंही पाहायला मिळालंय.. मात्र, चेतन धसेने प्रसिध्द चित्रकार रवी वर्मा यांचं जगप्रसिध्द शकुंतला या महिलेच्या चित्राचं विणकाम कऱण्याचं ठरवलं. हे काम कऱण्यासाठी त्याला तब्बल पावणेदोन महिन्यांचा कालावधी लागलाय... ही पैठणी सध्या येवल्यात चर्चेचा विषय ठरत आहे. या पैठणीला साधारण दिड ते पावणेदोन लाख रुपयांची किंमत मिळावी अशी अपेक्षा चेतन याने व्यक्त केलीये...
Continues below advertisement