Nashik : गरीब विद्यार्थ्यांनी शिकायचं तरी कसं? यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या शुल्कात मोठी वाढ
नाशिकच्या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठानं 'नफेखोरी'चं धोरण सुरू केलंय का?, असा प्रश्न सध्या विचारला जातोय. कारण विद्यापीठानं या शैक्षणिक वर्षात अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक शुल्कात केलेली भरमसाठ वाढ. विद्यापीठानं बी. ए. आणि बी.कॉम. प्रथम वर्षाच्या शैक्षणिक शुल्क १ हजार ७०२ वरून थेट २ हजार ९८८ रूपये केलीय. ही वाढ ७५ टक्के आहे. याशिवाय बी. एस.सी. ५५ टक्के, डी.सी.एम ३५ टक्के आणि एम.ए. साठी ३६ टक्के शैक्षणिक शुल्क वाढवण्यात आलंय. मुक्त विद्यापीठाच्या या धोरणामुळे राज्यातील लाखो गरीब विद्यार्थ्यांवर आर्थिक भुर्दंडाचा बोजा पडलाय शिवाय त्यांचं शिक्षणच धोक्यात आलंय.