Nashik : पाणी भरण्यासाठी गेलेली महिला तोल जाऊन विहिरीत पडली ABP Majha

पाणी भरताना महिला तोल जाऊन थेट विहिरीत कोसळल्याची घटना नाशिकच्या पेठ तालुक्यातील बोरीची बारी गावात घडलीय. दैव बलवत्तर आणि स्थानिकांनी धावपळ करत या महिलेला सुखरुप विहिरीतून बाहेर काढल्याने मोठा अनर्थ टळलाय. पाचशेहून अधिक लोकसंख्या असणाऱ्या गावात गेल्या काही महिन्यांपासून तीव्र पाणी टंचाई निर्माण झालीय.गावात दोन तीन दिवसातून एकदा पाण्याचा टँकर येतो. मात्र एक ड्रमपेक्षा जास्त पाणी मिळत नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. त्यामुळे पाण्यासाठी ग्रामस्थांना पायपीट करावी लागतेय. पाण्याच्या शोधात ही महिला एका खासगी विहिरीवर पोहोचली. मात्र पाणी भरताना तोल जाऊन ती विहिरीत कोसळली. महिलेने आरडाओरडात करताच स्थानिकांनी धावाधाव केली आणि तिला सुखरुप बाहेर काढलं. धरणांचा जिल्हा अशी ओळख असणाऱ्या नाशिकमधील ग्रामस्थांचा पाण्याचा संघर्ष कधी थांबणार असा सवाल उपस्थित होतोय. हनुमान चालिसा पठण ते राज्यसभा निवडणुकांमध्ये व्यस्त असलेल्या नेतेमंडळींना पाणीप्रश्नांकडे लक्ष देण्यासाठी वेळ मिळणार का असा सवाल उपस्थित होतोय.,

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola