Nashik: श्वसनाचे विकार असलेल्या महिलेचा प्राणायम करताना मृत्यू ABP Majha

Continues below advertisement

प्राणायम... योगासनात प्राणायमचं अनन्य साधारण महत्व आहे... पण जर एखाद्याला श्वसनाचे विकार असतील तर त्यांनी योग्य पद्धतीनं, तसंच तज्ज्ञांच्या सल्ल्यानंच प्राणायम करणं का गरजेचं आहे हे नाशकातल्या घटनेनं अधोरेखित केलंय... प्राणायम करताना अचानक छातीत दुखू लागल्यानं सोनल आव्हाड या महिलेचा मृत्यू झालाय. सोनल या मखमलाबादच्या रहिवाशी होत्या.. सकाळी प्राणायम करताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं आणि त्या जमिनीवर कोसळल्या.. कुटुंबियांनी त्यांना तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केलं. त्यामुळं योगासनं करा.... किंबहुना दिर्घायुष्यासाठी ती केलीच पाहिजे.... पण योग्य पद्धतीनं आणि जर आपल्याला व्याधी किंवा आजार असतील तर तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखालीच केली पाहिजेत... 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram