Nashik|5 लाखांचं बिल भरुनही सव्वा लाख रुपयांच्या बिलासाठी वोकहार्ट हॉस्पिटलने रुग्णाला 3दिवस डांबलं?

नाशिक शहरात एकीकडे रुग्णांना बेड मिळत नाही आणि दुसरीकडे बिल अदा केले नाही म्हणून रुग्णांचा डिस्चार्ज रोखून धरला जात आहे, जळगांवहुन आलेल्या एका वृद्धावर नाशिकच्या वोकहार्ट खाजगी रुग्णलयात उपचार सुरू होते, सुरवातीला 50 हजार अनामत रक्कमेसह पाच लाख रुपयांचे बिल भरूनही सव्वा लाख रुपयांच्या बिलासाठी तीन दिवस रुग्णाला उपचारा विनाचा रुग्णालयात डांबून ठेवले, अखेर माजी पालकमंत्री गिरीश महाजन यांना याबाबत माहिती मिळाल्यानंतर भाजप नगरसेवक मुकेश शहाणे आणि महापालिकाचे अतिरिक्त आयुक्त सुरेश खाडे यांनी रुग्णालयात जाऊन धाव घेतली असता रुग्णाला रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला, मात्र या स्वरूपाच्या तक्रारी शहरातील इतर हॉस्पिटलमधून येत असून प्रशासनाने लक्ष घालण्याची गरज आहे, दरम्यान या प्रकरणी रुग्णलया व्यवस्थापनाकडून कोणीही बोलायला तयार नाही.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola