Nashik Unlock : नाशिकमधील बंद असलेली सलून पार्लर आजपासून पुन्हा सुरु
जवळपास गेल्या दोन महिन्यांपासून नाशिकमधील बंद असलेली सलून पार्लर आजपासून पुन्हा सुरु करण्यात आल्याने सलून व्यावसायिकांकडून समाधान व्यक्त केलं जातय, सध्या दुकानांमध्ये साफसफाई आणि सॅनिटायझेशनच्या कामाला वेग आला असून दुकाने सुरु करण्यासाठी परवानगी द्या या मागणीसाठी अनेक वेळा सलून व्यावसायिकांकडून आंदोलनही करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून नाशिकमधील कोरोनाचा संसर्ग कमी होत असल्याचं दिसून येताच जिल्ह्यातील लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले आहेत. काल जिल्हाधिकारी कार्यालयात पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना आढावा बैठकीच आयोजन करण्यात आलं होत या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
Tags :
Maharashtra Uddhav Thackeray Nashik Nashik Unlock Covid-19 Covid Lockdown Odd-even Rule Non-essential Shops Salon Parlor