Nashik Trimbakeshwar : त्र्यंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणात आता नाशिकमधील आखाडा परिषदेची उडी
त्रंबकेश्वर मंदिर प्रवेश प्रकरणात आता नाशिकमधील आखाडा परिषदेनं उडी घेतली आहे.. आखाडा परिषद साधू-संतांची सत्यशोधन समिती नेमली आहे.. धूप दाखविण्याची प्रथा खरंच आहे का, असेल तर किती वर्षं जुनी आहे, याचा अभ्यास ही समिती करणार आहे, आणि मग तो अहवाल सरकारला सादर करणार आहे. त्र्यंबकेश्वरमधील ज्येष्ठ नागरिक, पुरोहित अभ्यासक यांच्याशी संवाद साधून ही समिती या कथित प्रथेचा अभ्यास करणार आहे.