Nashik Trimbakeshwar Shravan Somvar : शेवटचा श्रावणी सोमवार, त्र्यंबकेश्वरला रांग, भाविकांची गर्दी
Continues below advertisement
आज शेवटचा श्रावणी सोमवार आहे. बारा ज्योतिर्लिंगापैकी आद्य ज्योतिर्लिंग असलेल्या नाशिकच्या त्र्यंबकेश्वर महादेवाच्या दर्शनाला राज्यभरातून हजारो भाविक दाखल झाले आहेत. पहाटेपासूनच दर्शनासाठी मंदिराबाहेर रांगा लागल्या आहेत. बम बम भोलेच्या गजराने त्र्यंबकनगरी दुमदुमून गेली आहे. श्रावणी सोमवारी त्र्यंबकेश्वरच्या ब्रम्हगिरी पर्वताला प्रदक्षिणा म्हणजेच फेरी मारण्याची पुरातन प्रथा असून ही फेरी पूर्ण केल्याने पुण्य मिळते, मनाला शांती मिळते अशी अख्यायिका आहे. काल संध्याकाळपासूनच भाविक त्र्यंबकमध्ये दाखल होण्यास सुरुवात झाली होती.
Continues below advertisement