Nashik Cold : किमान तापमानात घट, नाशिककर गारठले, नाशिकचे तापमान 9 अंशावर
यंदाच्या हंगामात अपेक्षेप्रमाणे नाशिककरांना थंडीचा अनुभव घेता आला नव्हता मात्र गेल्या दोन दिवसांपासून किमान तापमानात घट होत असल्याने नाशिककर सध्या चांगलेच गारठले आहेत. मकर संक्रांतीपासून दिवस वाढतो आणि तीळ तीळ थंडी कमी होते असे खर तर म्हटले जाते मात्र यंदा उलट चित्र बघायला मिळतंय, रविवारी 15 अंशांवर असलेले तापमान बुधवारी 9 पर्यंत खाली आले आणि यामुळे साहजिकच नाशिककरांना उबदार कपडे परिधान केल्याशिवाय घराबाहेर पडणेही अवघड झाले आहे. विशेष म्हणजे दुपारी उन्हाचा तडाखा तर दुसरीकडे सकाळी तसेच रात्री वातावरणातील वाढता गारवा यामुळे साथीच्या आजारांच्या रुग्णांमध्ये देखिल वाढ झाल्याचं दिसून येतय.