Private Coaching classes | नाशिकमध्ये खासगी कोचिंग क्लासेस सुरु; विद्यार्थ्यांना काय वाटतं?

लॉकडाऊनमध्ये बंद करण्यात आलेले नाशिक जिल्ह्यातील खासगी क्लासेस जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगी नंतर आजपासून सुरु करण्यात आले आहे. यामुळे क्लास संचालकांसह विद्यार्थ्यांकडूनही समाधान व्यक्त केलं जातय. जिल्ह्यात जवळपास अडीच हजार कोचिंग क्लासेस असून कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता गेल्या दहा महिन्यापासून सर्व छोटे, मोठे क्लासेस बंद होते. मात्र यामुळे क्लासच्या जागेचे भाडे, कर्जाचे हप्ते, शिक्षक कर्मचार्‍यांचे पगार, इतर घरगुती व आजारपणाचे खर्च निघत नसल्याने अनेक क्लास चालक आर्थिक अडचणीत सापडले होते. या सर्व परिस्थितीचा विचार प्रशासनाने करावा तसेच कोरोना रुग्णसंख्येचही प्रमाण कमी झाल्याने क्लासेस सुरु करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी खासगी कोचिंग क्लास असोसिएशन कडून जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांच्याकडे करण्यात आली होती.. कोरोनाच्या पार्श्वभूमिवर शासनाने घालून दिलेल्या सर्व नियमांच पालन क्लासेस कडून करण्यात येत असून आज पहिलाच दिवस असल्याने क्लासेसला सजावट करण्यात आली असून विद्यार्थ्याचही स्वागत करण्यात आलय..

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola