दोघांचं भांडण, तिसऱ्याचा लाभ; नाशिक महापालिकेच्या स्थायी समितीचं हंगामी अध्यक्षपद मनसेकडे | ABP Majha

दोघांचं भांडण तिसऱ्याचा लाभ अशी म्हण प्रचलित आहे, पण या म्हणीनुसारच नाशकात मनसेला मोठा लाभ झालाय. कारण स्थायी समितीवरून शिवसेना-भाजपमध्ये झालेल्या वादात समितीचं हंगामी अध्यक्षपद मनसेच्या अशोक मुर्तडक यांना देण्यात आलंय.
मध्यंतरी झालेल्या पोटनिवडणुकीत शिवसेना आणि भाजपच्या सदस्य संख्येत बदल झाला, त्यानुसार स्यायी समितीच्या सदस्यांमध्ये शिवसेनेचे ३ आणि भाजपच्या ३ सदस्यांची नियुक्ती होणं अपेक्षित होतं, मात्र तसं न होता भाजपचे ४ सदस्य निवडले गेल्यानं शिवसेनेनं नगरविकास खात्याकडे तक्रार करत निवडणुकीवर स्थगिती आणली.
दरम्यान हंगामी अध्यक्षपदी मनसेच्या मूर्तडक यांना नेमणुकीवरून मावळते सभापती उद्धव निमसेंनी भाजपवर टीकास्त्र सोडलंय.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola