Lockdown 4.0 | ST Bus Service | रेड झोन, कंटेन्मेंट झोन वगळता एसटी सेवा सुरु होणार
सरकारच्या नव्या मार्गदर्शक सूचनानुसार उद्यापासून रेड झोन आणि कंटेनमेंट झोन व्यतिरिक्त इतर भागात एस टी महामंडळाची बस सेवा सुरू होणार आहे. नाशिक जिल्ह्यातील नाशिक आणि मालेगाव महापालिका क्षेत्र व्यतिरिक्त इतर परिसर नॉनरेड झोन घोषित करण्यात आलाय. त्यामुळे सोशल डिस्टसिंगचे पालन करून बस सेवा सुरू करण्याच नियोजन केले जातंय.