Nashik Sinnar Bus Accident : प्रत्यक्षदर्शीने सांगितला सिन्नरमधील अपघाताचा थरार ABP Majha
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppNashik Sinnar Bus Accident : प्रत्यक्षदर्शीने सांगितला सिन्नरमधील अपघाताचा थरार ABP Majha
सिन्नर शिर्डी महामार्गावरील पाथरी गावाजवळ ट्रक आणि खाजगी बसच्या भीषण अपघातात बसमधील बदहा जणांचा मृत्यू झालाय तर 22 जण जखमी झाले आहेत. दरम्यान बसचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता, हळू चालव म्हणून आम्ही दोन वेळा त्याला सांगितले होते पण तो ऐकत नव्हता अशी माहिती बसमध्ये मागून दुसऱ्या सीटवर बसलेल्या प्रत्यक्षदर्शी प्रवासी दिनेश राठोड यांनी एबीपी माझाला दिली आहे. बसचा चालक भरधाव वेगात गाडी चालवत होता, हळू चालव म्हणून आम्ही दोन वेळा त्याला सांगितले होते, आम्ही पुढच्या सीटवर आदळायचो एवढ्या जोऱ्यात तो ब्रेक मारायचा. सकाळी अपघात झाला तेव्हा बसमधील सर्व जण झोपेत होते, अंधार होता ट्रकला धडक झाली तेव्हा मोठा आवाज झाला, सर्व घाबरले होते, बस पलटी झाली होती. मी खिडकीची काच फोडून बाहेर उडी मारली, काहीच कळत नव्हते.