
Nashik ShivJayanti | शिवजंयतीनिमित्त नाशिकमध्ये साकारली 'निष्ठेची पायरी'
नाशिकमध्ये शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने छत्रपती सेनेकडून उभारण्यात आली निष्ठेची पायरी, हिरोजी इंदुलकरांचे वंशज धनंजय आणि संतोष इंदुलकरांच्या हस्ते करण्यात आले प्रतिमेचे अनावरण...
नाशिकमध्ये यंदाच्या वर्षी छत्रपती सेनेच्या माध्यमातून शिवजन्मोत्सवाच्या निमित्ताने भव्य अशी निष्ठेची पायरी साकारण्यात आलीये...
रायगडाच्या उभारणी वेळी हिरोजी इंदलकरांनी जी निष्ठेची पायरी उभारली होती त्या पायरीच्या प्रतिकृतीचे अनावरण हिरोजी इंदुलकरांचे वंशज संतोष इंदुलकर यांच्या हस्ते करण्यात आले. नाशिकच्या सीबीएस परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाच्या ठिकाणी ही पायरी उभारण्यात आली आहे... याचाच आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी...
हे देखील वाचा
याचा अर्थ तू राजीनामा दे... अजित पवारांच्या वक्तव्यानंतर जितेंद्र आव्हाडांनी सगळंच काढलं, मुंडे-धसांनाही झाडलं
मुंबई : महायुती सरकारमधील मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडेंच्या (Dhananjay munde) राजीनाम्याची मागणी बीडमधील लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी सातत्याने केली आहे. विशेष म्हणजे मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी करत पुरावे घेऊन अंजली दमानिया यांनी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते अजित पवार यांची देखील भेट घेतली होती. तर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटूनही राजीनाम्याची मागणी करत चर्चा केली होती. त्यावेळी, मुंडेंच्या राजीनाम्याचा निर्णय अजित पवार घेतील, असे उत्तर मुख्यमंत्र्यांनी दिले होते. मात्र, अद्यापही धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्यात आला नाही. त्यावरुन, आता अजित पवारांनी (Ajit pawar) केलेलं वक्तव्य चर्चेत असून राजकीय वर्तुळातून थेट अजित पवारांना लक्ष्य केलं जात आहे. धनंजय मुंडेंनीच राजीनाम्याचा निर्णय घ्याव, या अजित पवारांच्या वक्तव्यावर अंजली दमानिया, मंत्री संजय शिरसाट यांच्यानंतर आता आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील अजित पवारांवर निशाणा साधला. अजित दादांची घुसमट होतेय, असे आव्हाड यांनी म्हटलं आहे.
अजित पवार जे बोलतात ते खर आहे, त्यांच्यावर जेव्हा आरोप झाले होते तेव्हा त्यांनी स्वतःहून राजीनामा दिला होता. तेव्हा, तुम्ही राजीनामा देऊ नका असे बहुसंख्य आमदारांनी अजित पवारांना सांगितलं होतं. महाराष्ट्राची परंपरा आहे, जेव्हा मोठे आरोप होतात आणि ज्यावेळी चौकशी लागते तेव्हा तो व्यक्ती सत्तेच्या वर्तुळातून बाहेर पडतो. सत्तेच्या सोबत राहिलेल्या माणसाला पोलिसांचं अभय मिळतं, त्यामुळे अजित पवारांनी तेव्हा घेतलेला निर्णय योग्य होता, असे जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं.