Nashik : आघाडीचा धर्म फक्त शिवसेनेनंच पाळायचा का? शिवसेनेचे माजी आमदार Yogesh Gholap यांची खदखद
शिवसेनेतील विद्यमान आमदारांच्या अभूतपूर्व बंडानंतर माजी आमदारानंही राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधलाय. आघाडीचा धर्म फक्त शिवसेनेनंच पाळायचा का असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार योगेश घोलप यांनी उपस्थित केलाय. फेसबुक पोस्टच्या माध्यमातून घोलप यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केलीय.. नाशिकमध्ये देवळालीच्या राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे यांच्या कारभारावर घोलप यांनी उघड नाराजी व्यक्त केलीय.. कुठल्याच कामात विचारात घेतलं जात नसल्याचा आरोप घोलप यांनी केलाय.. तसंच आगामी निवडणुका स्वबळावर लढण्याचा निर्धारही घोलप यांनी फेसबुक पोस्टच्या माध्यमातून व्यक्त केलाय...