
Nashik : 'सेल्फी विथ शौचालय' स्पर्धा, नाशिकच्या शिक्षण विभागाच्या परिपत्रकाची चर्चा
Continues below advertisement
आता बातमी आहे नाशिक जिल्ह्यातून... नाशिकच्या शिक्षण विभागानं काढलेल्या एका परिपत्रकाची सध्या सगळीकडे जोरदार चर्चा होतेय.... या परिपत्रकानुसार जागतिक शौचालय दिनानिमित्ताने शिक्षण विभागाने विविध स्पर्धाचे आयोजन केले आहे यात पथनाट्य, चित्रकला , टॉयलेटसह सेल्फी स्पर्धाही भरविण्यात आले आहे, चौथी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी या स्पर्धा आहे. मात्र या स्पर्धांमुळे शिक्षकांचं धाबं दणाणलंय. कारण अनेक शाळांमध्ये शौचालयांची अवस्था बिकट आहे.. अशा परिस्थिती सेल्फी काढण्यासाठी शौचालयाची स्वच्छता करणार कोण असा प्रश्न अनेक शिक्षकांनी विचारलाय आणि या परिपत्रकाला विरोधही केलाय.
Continues below advertisement