Nashik Sambhaji Brigade : सावरकरांवरुन संभाजी ब्रिगेड -ठाकरे गट आमने-सामने : ABP Majha
Continues below advertisement
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांनी युती केली खरी मात्र या नव्या यूतीत जुनेच मतभेद अजूनही खोडा घालत असल्याचा प्रत्यय काल नाशिकमध्ये आलाय.... संभाजी ब्रिगेडच्या वर्धापनदिनाच्या निमित्तानं आयोजित मेळाव्यात ठाकरे गट आणि संभाजी ब्रिगेड यांच्यात सावरकरांवरून मतभेद दिसून आले... मेळाव्यात संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते गंगाधर बनबरे यांनी आपल्या भाषणात स्वतयंत्रविर सावरकर यांच्यावर टीका केली, टीका करतांनाच बाबासाहेब आंबेडकरांचा एका भाषणाचा संदर्भ दिला. त्यांच्या याच विधानावर ठाकरे गटाचे भास्कर जाधव यांनी आक्षेप घेतला. तुमची आमची युती असली तरीही बोलण्याचे भान ठेवा या शब्दात संभाजी ब्रिगेडच्या प्रवक्त्याना भर मंचावरून सुनावले
Continues below advertisement