Nashik Scenery : पावसानं त्र्यंबकेश्वरचं रुपडं पालटलं, निसर्गाचा अनंद लुटण्यासाठी पर्यटकांची गर्दी
Continues below advertisement
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरची तीर्थक्षेत्रासोबतच पर्यटननगरी म्हणून देखिल ओळख आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यात गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाली होती मात्र गेल्या तिन ते चार दिवसांपासून पावसाचा जोर कमी झाला असून बहरून गेलेल्या निसर्गाचं मनमोहक आणि नयनरम्य दृश्य ईथे आता नजरेस पडतय. डोंगर रांगांवर पसरलेली धुक्याची चादर, उंच डोंगरांवरुन वाट काढत खाली कोसळणारे पांढरे शुभ्र धबधबे, चाहुबाजूंनी हिरवळ, पावसाच्या कोसळणाऱ्या हलक्या हलक्या सरी आणि यामुळे ओलेचिंब झालेले रस्ते हे सर्व काही बघून भाविकही निसर्गाच्या प्रेमात पडतात. दरम्यान त्र्यंबकेश्वरच्या याच निसर्गसौंदर्याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी.
Continues below advertisement
Tags :
Abp Majha Nashik ABP Majha Trimbakeshwar Rain Trimbakeshwar Jyotirling Mandir Nashik Scenery Nashik Trimbakeshwar