Nashik Rain : अवकाळीचा द्राक्षांना फटका, द्राक्षाच्या मण्याना तडे गेल्याने दर कोसळण्याची भीती

Continues below advertisement

अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा राज्यातल्या अनेक भागांना फटका बसलाय.. नाशिक जिल्ह्याला सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाचा फटका बसलाय.. नाशिकमधील कळवण पाठोपाठ चांदवड तालुक्यातही काल अवकाळी पाऊस आणि गारपीट झाली...  कांदा, हरभरा, आंबा, द्राक्ष मातीमोल होण्याची वेळ आलीये..त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय.. कळवणमधील एकलहरे, नाकोडे, शिरसमणी, ओतूरमध्येही गारांचा पाऊस झालाय त्यामुळे पिकांना फटका बसण्याची तसंच रोगराई वाढण्याची शक्यता वर्तवली जातेय.. कांद्यापाठोपाठ द्राक्षबागांनाही अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता आहे तसंच द्राक्ष मण्यांना तडे गेल्याने दर कोसळण्याची भीती व्यक्त होतेय

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram