Nashik Police Recruitment : नाशिकमध्ये पोलीस भरतीसाठी उमेदवारांचा कसून सराव : ABP Majha
Continues below advertisement
ज्या पोलिस भरतीकडे महाराष्ट्रातील लाखो तरुणाईचे गेल्या अनेक वर्षांपासून लक्ष लागले होते त्या पोलिस भरती प्रक्रियेला आता तिनच दिवसांनी म्हणजे २ जानेवारी पासून सुरुवात होणार असून आपले पोलिस होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी कडाक्याच्या थंडीत देखिल पहाटे पहाटे हजारो उमेदवार कसून सराव करत घाम गाळतांना नाशिकच्या गोल्फ क्लब मैदानावर नजरेस पडतायत. नाशिक शहरातूनच नाही तर त्र्यंबकेश्वर, पेठ, इगतपुरी अशा ग्रामीण आणि आदिवासी भागातूनही ते मैदानावर दाखल होतायत. राज्यात 18 हजार 331 जागांसाठी ही भरती होणार आहे मात्र त्यासाठी तब्बल 18 लाखाहून अधिक उमेदवारी अर्ज दाखल झाल्याने हे मोठं आव्हान या प्रत्येकासाठी असणार आहे. ही संपूर्ण पोलिस भरती प्रक्रिया आता सुरळीत आणि पारदर्शी पद्धतीने पार पडावी अशीच ईच्छा या उमेदवारांनी एबीपी माझाशी बोलतांना व्यक्त केलीय.
Continues below advertisement