Nashik | आडगावकर ज्वेलर्समध्ये गुंतवणूकदारांचा गोंधळ, पैसे मिळत नसल्याने गुंतवणूकदार संतप्त | ABP Majha

नाशिकमधील प्रसिद्ध आडगावकर सराफ पेढीत गुंतवणूकदारांनी गोंधळ घातलाय. गुंतवणूक केलेले पैसे अनेक महिन्यांपासून परत मिळत नसल्याने गुंतवणूकदार संतप्त झाले आहेत. सुवर्णसंधी योजना, दूरदृष्टी योजना अशा अनेक योजनांच्या नावाखाली आडगावकर ज्वेलर्सने पैसे गोळा केले असा गुंतवणूकदारांचा आरोप आहे. मात्र अनेक महिन्यांपासून व्याज तर सोडा पण मुद्दलही मिळत नसल्याने ग्राहक संतप्त झाले आहेत. सध्या या सर्व परिस्थितवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस उपायुक्तांसह फौजफाटा इथे दाखल झाला आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola