Mumbai Nashik Potholes :मुंबई-नाशिक महामार्गावरील खड्डे बुजवेपर्यंत टोल भरणार नाही,कोणी दिलाय इशारा?
Continues below advertisement
मुंबई-नाशिक महामार्गावर प्रचंड खड्डे पडले आहेत. याचा फटका आता प्रवाशांसोबत व्यापारी समुदायाला बसू लागला आहे. त्याची तीव्रता इतकी आहे की खड्डे बुजवेपर्यंत टोल भरणार नाही असा इशारा नाशिकमधील २६ हून अधिक संघटनांनी दिला आहे. यामध्ये व्यापारी, उद्योजक आणि बांधकाम व्यावसायिकांच्या योजनांचा समावेश आहे. मुंबईला जाण्यासाठी पाच ते सहा तास लागतात, रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाहनांची अवस्थाही खराब होते, अशी त्यांची भूमिका आहे. या संघटनांचे पदाधिकारी आज मुख्यमंत्र्यांना भेटणार आहेत. त्याआधी ते उद्योगमंत्र्यांना भेटून टोलमाफीचं निवेदनही देणार आहेत.
Continues below advertisement