Nashik : कांद्याला कवडीमोल भाव, नाशकात शिरीषकुमार कोतवाल यांचं शेतकऱ्यांसह उपोषण

कांद्याला कवडीमोल भाव मिळत असताना नाफेडकडून अद्यापही कांद्याची बाजार समितीतून थेट खरेदी होत नसल्याने माजी आमदार शिरीषकुमार कोतवाल यांनी शेतकऱ्यांसह आमरण उपोषण सुरू केले आहे. कांद्यासह कुठल्याच भाजीपाला ला भाव मिळत नसल्याने शेतकऱ्यांचे जगणं ही अवघड झाल्यानं स्वेच्छा मरणाची परवानगी देण्याची मागणी असंख्य शेतकऱ्यांनी पत्राद्वारे राष्ट्पतीकडे केलीय.  नाफेडच्या माध्यमातून कांदा खरेदी करावी, कांद्याला हमीभाव आणि अनुदान मिळावे, द्राक्षसह इतर भाजीपाला ला हमीभाव द्यावा अशी मागणी आहे, जो पर्यंत मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत उपोषण मागे घेणार नसल्याचाइशारा त्यांनी दिलाय त्याच्यांशी बातचित केलीय प्रतिनिधी मुकुल कुलकर्णी यांनी
 
 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola